अभिनंदनीय…!, निलेश पारकर यांचा सिंधुदुर्ग ‘डाएट’तर्फे सन्मान.! ; शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिक, उल्लेखनीय योगदान..!

171

सावंतवाडी : कणकवली येथील सौ. इंगेट्राऊट अध्यापक विद्यालयाचे लिपीक तथा शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील उपक्रमशील व्यक्तीमत्व निलेश पारकर यांचा नुकताच त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग (डाएट) यांच्या तर्फे मान्य वरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र देऊन सन्मान करण्यात आला.निलेश पारकर हे अध्यापक विद्यालय कणकवली येथे कार्यरत आहेत.२००६ पासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, आयोजित डीएलएड परीक्षा केंद्रावर त्यांनी लिपीक म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली आहे.
गेल्या तब्बल सतरा वर्षांत चौतीस परीक्षेचे कामकाज त्यांनी बिनचूक केले आहे. परीक्षा कामकाजाची पोचपावती त्यांना या सन्मानातून प्राप्त झाली आहे. डाएटचे प्राचार्य सुशील शिवलकर, परीक्षा विभाग प्रमुख बी. एस. कांबळे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रा. बी. एस. कांबळे, डॉ. एल. बी. आचरेकर, डॉ. एस. ए.पवार, प्रा.आर. पी. जाधव, व विशेष सहाय्यक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य  शिवलकर यांनी आपल्या भाषणात निलेश पारकर यांचेबद्दल कौतुक करताना सांगितले की, सन २००६ पासून श्री. पारकर हे डी. एड. परीक्षा कामकाज अत्यंत गोपनियरीत्या व शासनाच्या नियमांचे योग्य पालन करीत, परीक्षा केंद्रसचालक, परीक्षक, परीक्षा केंद्रावरील कर्मचारी वर्ग, कस्टडी विभागाचे पोलीस कर्मचारी, परीक्षार्थी व इतर भौतिक सुविधांकडे बारकाईने लक्ष देऊन केलेले आहे. त्याचबरोबर श्री. बी. एस. कांबळे, श्री. आर. पी. जाधव (अधिव्याख्याता ) यांनीही आपले परीक्षा कामकाजातील अनुभव कथन केले.

या सत्काराबाबत निलेश पारकर यांचे एस. एस. शिवलकर (प्राचार्य, डाएट) सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद, कणकवली शिक्षण संस्था, कणकवलीचे डॉ. एस. एन. तायशेटे (चेअरमन), डी. एम. नलावडे (सचिव), एम. ए. काणेकर (व्हा. चेअरमन),  एस. व्ही. सोनुर्लेकर ( प्राचार्य, अ. वि. कणकवली) व सर्व कर्मचारी वृंद, जिल्हयातील सर्व अध्यापक विद्यालयाचे कर्मचारी वृंद, महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अनिल माने (राज्याध्यक्ष ), शिवाजी खांडेकर (राज्य सरचिटणीस), अनिल राणे (जिल्हाध्यक्ष), गजानन नानवे (जिल्हा कार्यवाह) व जिल्हाभरातील तमाम शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, तसेच ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ, सावंतवाडी यांनी अभिनंदन करीत त्यांना भावी कार्यकालासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

निलेश पारकर हे जिल्ह्यातील विविध संस्थांतून कार्य करत आहेत. यानिमित्ताने त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे.
या कार्यात सर्वांचं सहकार्य लाभले आहे. या सत्कारातून भविष्यात त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळेल.
या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

डाएटकडून सन्मान ही माझी परीक्षा कामकाजाची पोचपावती – निलेश पारकर

या सत्काराबाबत कृतज्ञता व्यक्त करताना पारकर म्हणाले,  मी सन २००६ पासून डी. एड. परीक्षा अध्यापक विदयालय, तोंडवली, बॅ. नाथ कॉलेज, कुडाळ, एस. एम. हायस्कूल कणकवली या ठिकाणच्या जिल्हा परीक्षा केंद्रांवर लिपीक म्हणून काम केलेले असून, यावेळी मोहन सावंत साहेब, जोशी साहेब, दुर्गुळे साहेब, वडर साहेब, राऊत साहेब, किशोर गवस साहेब (ग.शि.पंचायत समिती, कणकवली), श्रीमती. अनुपमा तावशीकर मॅडम यांचेसोबत काम करण्याची संधी मिळालेली होती. तसेच त्यांचेकडून अनेक गोष्टी शिकता आल्या, याचा मला फार आनंद आहे.

त्याचबरोबर यू.बी. घाटे, श्रीमती मेटे, कै. पी. व्ही. जाधव, श्री. एस. एस. शिवलकर (प्राचार्य, डाएट) तसेच श्री. ए. पी. पाटील, श्री. आर. पी. जाधव, श्री. बी. एस. कांबळे (अधिव्याख्याता) यांचेही बहुमोल असे सहकार्य लाभलेले आहे. वरील परीक्षा कालावधीत डॉ. महेश पालकर साहेब ( माजी आयुक्त, परीक्षा परिषद, पुणे / संचालक योजना शाखा -पुणे), शिवाजी पाटील ( परीक्षा परिषद, पुणे), डॉ. मुश्ताक शेख (माजी शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग) व इतर अधिकारी वर्गाने परीक्षा केंद्रास भेटी देऊन माझ्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. यावेळी श्री. पारकर त्यांनी डाएट सिंधुदुर्गने केलेल्या सत्काराबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

अध्यापक विद्यालयानेही केला सत्कार… 

दरम्यान निलेश पारकर यांचा सौ. इंगेट्राऊट अध्यापक विद्यालयामार्फत देखील सत्कार करण्यात आला.
अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. व्ही. सोनुर्लेकर, शिक्षक प्रशिक्षक प्रा. पी. ए. यादव, प्रा. सुचिता गायकवाड, प्रा. प्रदीप वळवी यांच्या हस्ते त्यांचा विद्यालयतर्फे सन्मान झाला तसेच पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.