देसाई अध्यापक विद्यालयात ‘भारतीय हिंदी दिवस’ उत्साहात संपन्न..! ; बॅंक ऑफ इंडिया झोनल कार्यालय रत्नागिरी यांचे सहकार्य.

93

रत्नागिरी : येथील स .रा. देसाई अध्यापक विद्यालयात गुरुवार १४ सप्टेंबर २०२३ रोजी ‘भारतीय हिंदी दिवस ‘ कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. हिंदी दिनाचे औचित्य साधून स. रा. देसाई डीएलएड कॉलेज आणि बँक ऑफ इंडिया झोनल कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिनाचा कार्यक्रम स .रा. देसाई  अध्यापक विद्यालयात  संपन्न झाल. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ इंडियाचे किरण खोपडे, विपणन अधिकारी, चंदनकुमार ताम्रकर वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी आणि शुभम सिन्हा मुख्य मॅनेजर उपस्थित होते. या तीनही अतिथींनी राष्ट्र भाषा हिंदीचा प्रचार आणि प्रसार देशात सर्वत्र झाला पाहिजे, मातृभाषेच्या मानाबरोबरच राष्ट्र भाषेचा मान सन्मान प्रत्येक भारतीय नागरिकाने केला पाहिजे, असा संदेश दिला.

कार्यक्रमात छात्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हिंदीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी हिंदी विषयावर आधारित कविता,  भाषण, शेरो-शायरी, हिंदी साहित्य परिचय व स्वरचित कविता सादर केल्या व स्वतःचे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना कॉलेजचे प्राचार्य  नेताजी कुंभार यांनी हिंदी भाषेचे महत्व पटवून दिले.
कॉलेजमधील हिंदी विषयाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख प्रा. सुनील जोपळे यांनी हिंदी भाषेचा दैनंदिन जीवनात उपयोग केल्यास, हिंदी भाषा, राजभाषेकडून राष्ट्रभाषेकडे प्रवास करेल, असा आशावाद व्यक्त केला.
राष्ट्रभाषा हिंदीचा सन्मान प्रचार आणि प्रसार करणे हे प्रत्येक भारतीय व्यक्तीचे परम कर्तव्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षाची छात्राध्यापिका आस्मा काझी हिने केले तर आभार प्रदर्शन सायमा कोतवडेकरने केले.
या कार्यक्रमासाठी बँक ऑफ इंडिया झोनल कार्यालय रत्नागिरीचे राजभाषा विभाग प्रमुख श्री. गायकवाड यांनी डीएलएड  कॉलेजच्या मुलांसाठी निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन कॉलेजमे केले. तसेच स्पर्धत गुणवत्ता क्रमांक येणाऱ्या मुलांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली.
सदर कार्यक्रमाच्या शेवटी कॉलेजमध्ये हिंदी वार्ताफलकाचे अनावरण केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन नियोजन द्वितीय वर्षाच्या सर्व छात्राध्यापकांनी तसेच प्रा. सुनील जोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.