सावंतवाडी : १४ सप्टेंबर रोजी सर्व देशभरात हिंदी दिन साजरा केला जातो. कळसुलकर महाविद्यालयातही या निमित्ताने हिंदी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हिंदी भाषेची महती व्यक्त करणा-या काव्यरचनांचे वाचन विद्यार्थ्यांनी केले. निलेश वैद्य, ऋषिकेश मेस्त्री, कुणाल लाखे, अंजली डोईफोडे, सिमरन डोईफोडे यांनी कविता वाचनात सहभाग दर्शवला. तसेच हिंदी भाषा रोजगाराचे साधन कसे बनू शकते या विषयावर स्नेहा आडवे हिने विचार व्यक्त केले.
हिंदी भाषेचे महत्त्व सिया वैद्य व विक्रम वडर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विक्रम वडर याने केले. महाविद्यालयाच्या हिंदी विषय शिक्षिका श्रीम. परब मॅडम यांनी हिंदी भाषेच्या समृद्ध वाङ्मयाची परंपरा या विषयावर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कोलगावकर सर यांनी हिंदी भाषा दिन या विषयावर विचार व्यक्त केले तसेच भाषणाच्या अखेरीस हिंदी भाषेतील प्रेरणादायक गीत सादर करून कार्यक्रमास रंगत आणली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रमुख श्री.पाटील सर व श्रीम. नाईक मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींनी पारंपरिक पोशाख करून कार्यक्रमाला शोभा आणली.






