अमित न्हावी यांची सावंतवाडी पंचक्रोशी नाभिक संघटना विभागाध्यक्षपदी निवड..!

60

सावंतवाडी : सावंतवाडी पंचक्रोशी नाभिक संघटना विभागाची नूतन कार्यकारिणी नुकतीच सावंतवाडी तालुकाध्यक्ष सदानंद बाळा पवार यांच्या उपस्थितीत गजानन महाराज पतित पावन मंदिर मळेवाड येथे जाहीर करण्यात आली. अमित न्हावी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
जिल्हा उपाध्यक्ष सुनील म्हावेलकर, ता.उपाध्यक्ष सदानंद होडावडेकर, खजिनदार दया वेंगुर्लेकर, किरण आकेरकर, दीपक कारिवडेकर, समीर कवळेकर हे मान्यवर उपस्थित होते. तालुकाध्यक्ष व इतर मान्यवरांनी – नाभिक बांधवांना मार्गदर्शन केले.

ही कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष- अमित न्हावी, उपाध्यक्ष-नवनाथ तिरोडकर, सचिव- आनंद न्हावेलकर, सहसचिव अजय न्हावी, खजिनदार संदेश आरोसकर, – संपर्कप्रमुख वसंत चव्हाण, सहसंपर्क प्रमुख – सिद्धेश न्हावी, सल्लागार- सुनील सुनील न्हावेलकर, सखाराम चव्हाण, कार्याध्यक्ष-उत्तम न्हावेलकर, पुरुषोत्तम न्हावी, सदस्य- नंदकिशोर चव्हाण, आनंद न्हावी, अमोल न्हावी, अनिल तळवणेकर.