अभिमानास्पद …! ॲड. रुजूल पाटणकर यांना ‘इमर्जिंग एज्युकेशन हिरो अवॉर्ड’ जाहीर.! ; ३० सप्टेंबर रोजी मुंबई येथे होणार वितरण.!

1432

सावंतवाडी : येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे उपक्रमशील संचालक तथा आधुनिक शैक्षणिक उपक्रम राबविणारे, युवा संस्थाचालक ॲड. रुजूल पाटणकर यांना यावर्षीचा ‘इमर्जिंग एज्युकेशन हिरो अवॉर्ड 2023’ जाहीर झाला आहे.  एज्युकेटर एज्युकेशन ग्रोथ नेटवर्क (ईजीएन) या आंतरराष्ट्रीय सामाजिक, शैक्षणिक संस्थेतर्फे ॲड. रुजूल पाटणकर यांना 30 सप्टेंबर रोजी मुंबई येथील रेडिसन ब्ल्यू इंटरनॅशनल हॉटेल येथे रंगारंग अवॉर्ड समारंभात हा महत्त्वपूर्ण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.

ॲड. पाटणकर यांच्या विविध शैक्षणिक प्रयोगांनी प्रभावीत होत EGN या संस्थेमार्फत त्यांच्या मागील आठ वर्षाचा शैक्षणिक प्रवास लक्षात घेता हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ॲड. रुजूल पाटणकर यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव्ही होत आहे.  ‘टीम महाराष्ट्र माझा’कडून देखील त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हृदयपूर्वक शुभेच्छा.