नवी दिल्ली : भारताचे पुरूष आणि महिला क्रिकेट संघ चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या एशियन गेम्समध्ये खेळणार आहेत. 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या 19 व्या एशियन गेम्समध्ये भारतीय क्रिकेट संघ थेट क्वार्टर फायलनमध्ये खेळणार आहे. दरम्यान एशियन गेम्सचे क्रिकेट वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट संघ एशियन गेम्समध्ये पहिल्यांदाच सहभागी होणार आहे.
ऋतुराजकडे असणार नेतृत्व –
एशियन गेम्समध्ये 40 वेगवेगळ क्रीडा प्रकार आहेत. एशियन गेम्सची सांगता ही 8 ऑक्टोबरला होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाची धुरा ही युवा ऋतुराजच्या खांद्यावर असणार आहे. एशियन गेम्ससाठीच्या भारतीय क्रिकेट संघात आयपीएल आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
एशियन गेम्ससाठी पुरूष क्रिकेट संघाचे वेळापत्रक –
- भारत विरूद्ध TBC (QF 1), मंगळवार, 3 ऑक्टोबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड
- पाकिस्तान विरूद्ध TBC (QF 2), मंगळवार, 3 ऑक्टोबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड
- श्रीलंका विरूद्ध TBC (QF 3), बुधवार, 4 ऑक्टोबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड
- बांग्लादेश विरूद्ध TBC (QF 4), बुधवार, 4 ऑक्टोबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड
- विजेता QF1 विरूद्ध विजेता QF4 (पहला सेमीफाइनल), शुक्रवार, 6 ऑक्टोबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड
- विजेता QF2 विरूद्ध विजेता QF3 (दुसरा सेमीफाइनल), शुक्रवार, 6 ऑक्टोबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड
- पहला क्वार्टर फायनल हारणारा संघ विरूद्ध दुसरा क्वार्टर फायनल हारणारा संघ 7 ऑक्टोबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड
- फायनल, शनिवार, 7 ऑक्टोबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड.
एशियन गेम्स 2023 साठी महिला क्रिकेट संघांचे वेळापत्रक –
- भारत विरूद्ध TBC (QF 1), गुरुवार, 21 सप्टेंबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड
- पाकिस्तान विरूद्ध TBC (QF2), गुरुवार, 21 सप्टेंबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड
- श्रीलंका विरूद्ध TBC (QF 3), शुक्रवार, 22 सप्टेंबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड
- बांग्लादेश विरूद्ध TBC (QF 4), शुक्रवार, 22 सप्टेंबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड
- पहिला क्वार्टर फायनल जिंकणारा संघ विरूद्ध चौथा क्वार्टर फायनल सामना जिंकणारा संघ (सेमी फानयल 1) 24 सप्टेंबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड
- दुसरा क्वार्टर फायल जिंकणारा संघ विरूद्ध तिसरा क्वार्टर फायनल सामना जिंकणारा संघ (सेमी फायनल 2) 24 सप्टेंबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड
- पहिला सेमी फायनल हरणारा संघ विरूद्ध दुसरा सेमी फायनल हरणारा संघ (तिसऱ्या क्रमांकासाठी) 25 सप्टेंबर, पिंगफेंग क्रिकेट फिल्ड
- फायनल, 25 सप्टेंबर, पिंगफेंग क्रिकेट फील्ड.





