मुंबई : मुंबई विमानतळावर एका खासगी विमानाचा अपघात झाल्याची माहिती येत आहेत. या विमानामध्ये सहा जण असल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर विमानाचे दोन तुकडे झाल्याची माहिती असून त्यानंतर विमानाला मोठी आग लागली होती. VSR Ventures Learjet 45 विमान विशाखापट्टणमवरुन मुंबईला आलेलं होतं. धावपट्टी 27 वर उतरत असताना विमानाचा अपघात झाला. यामध्ये विमानात ६ प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स होते. अद्यापपर्यंत जीवितहानी झाल्याची माहिती नाही.






