विजयदुर्ग : विदर्भातील लोकांना कोकणात जाण्यासाठी ०११३९/४० नागपूर ते मडगाव प्रतिक्षा एक्सप्रेस नियमित कायमस्वरुपी सुरु करण्याची राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव संयुक्तपणे दि.१२ सप्टेंबर रोजी संयुक्तपणे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी याच्याकडे केली आहे.
याबाबत केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विदर्भातील अनेक महत्वाची तसेच धार्मिक ठिकाणे दर्शनाकरिता,पाहण्याकरीता कोकण प्रांतातील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येत येत असतात.
याचप्रमाणे विदर्भातील नागरिक कोकण भागातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ पाहण्याकरीता त्या भागात जात असतात मात्र विदर्भातून कोकण रेल्वे मार्गावर ०११३९/०११४० नागपूर मडगाव प्रतिक्षा एक्स्प्रेस २७ जुलै २०२२ ते १ ऑक्टोबर २३ पर्यंत मध्य रेल्वे विभागाकडून चालु करण्यात आले आहे विदर्भातून कोकणाकडे व कोकणाकडुन विदर्भाकडे येण्यासाठी प्रवाशांना अनेक ठिकाणी रेल्वे गाडी बदलुन नियोजित ठिकाणी ठिकाणी पोहोचावे लागत होते.
प्रवाशांची वाढती मागणी व रेल्वे गाडीचा चांगला प्रतिसाद बघून रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर ही ०११३९/०११४० रेल्वेला दैनिक कायमस्वरुपी सुरु करुन, सेवाग्राम, मूर्तीजापूर, शेगांव, नांदुरा, बोदवड, जळगाव जं., पाचोरा जं., चाळीसगाव जं., मनमाड जं. अशा मागणीचे निवेदन कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समिती मुंबई अध्यक्ष सुनील उत्तेकर, पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समिती मुंबई अध्यक्ष यशवंत परब, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले, दापोली तालुकाध्यक्ष नागेश मयेकर, मंडणगड तालुकाध्यक्ष संदेश गांधी यांच्यासह राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार माळगांवकर, संपर्कप्रमुख हर्षद भगत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, परिवहनमंत्री नितीन गडकरी, अध्यक्ष रेल बोर्ड, उपनिर्देशक (कोचिंग), ऑपरेशन व बिझनेस, महाप्रबंधक मध्य रेल, मंडळ रेल प्रबंधक भुसावळ, मुंबई, नागपूर यांना दिले आहे.






