कणकवली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत विद्यामंदिर कणकवली प्रशालेच्या खेळाडूंनी 14 वर्षाखालील मुलगे – प्रथम क्रमांक, 17 वर्षाखालील मुलगे – प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले वर्चस्व प्राप्त केले आहे. दोन्हीही संघांची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक सौ. व्ही. व्ही. जाधव व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर वर्गानी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक अच्युतराव वनवे व सुदिन पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.





