धक्कादायक : १६ वर्षीय विद्यार्थिनीवर पाच जणांकडून गँगरेप.! ; सर्व आरोपी जेरबंद.

250

सहारनपूर : उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका १६ वर्षीय विद्यार्थिनीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. सामूहिक अत्याचाराची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

संबंधित घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात सोमवारी घडली. येथील पाच नराधमांनी एका १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला. ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली. तसेच पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे, याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, पीडित विद्यार्थिनीने काल तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी तत्काळ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आणि दोन संशयितांना अटक केली. दोघांची कसून चौकशी केल्यानंतर इतर तीन आरोपींनाही जेरबंद करण्यात आलं आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.