मोठी बातमी – भाजप मुंबईमध्ये मोठ्या फेरबदलाच्या तयारीत ; विद्यमान खासदारांचे पत्ते होणार कट?

59

मुंबई : २०२४ सालची लोकसभा निवडणूक अगदीच जवळ येत आल्याचे पाहायला मिळत आहे. अश्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक सगळेच तयारीला लागले आहेत. यातच आता आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष मुंबईत उमेदवारांमध्ये बदल करू शकतो असे म्हटले जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भारतीय जनता पक्ष येत्या काळात काहीतरी मोठे बदल करू शकतो. मुंबई मधून भारतीय जनता पक्ष आशिष शेलार किंवा विनोद तावडे यांच्यापैकी एकाला लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकतो असे म्हटले जात आहे. यामुळे भारतीय जनता पक्ष काय निर्णय घेतो याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

याचबरोबर माजी खासदार किरीट सोमैय्या यांना देखील पुन्हा एकदा खासदार बनण्याची संधी मिळू शकते. २०१९ साली मातोश्रीची नाराजी होती म्हणून सोमय्यांचे तिकीट भाजपने कापले होते. मात्र आता काळ बदलला आहे. पर्यायी येत्या काळात सोमैय्या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील का? हे पाहणं अतिशय उत्सुकतेच ठरणार आहे.