कणकवलीच्या दोघा तरुणांना लाखोंची गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना अटक.! ; LCB सिंधुदुर्गची कौतुकास्पद कामगिरी.!

143

सिंधुदुर्गनगरी : महागड्या अलिशान कारमधून अवैधरित्या गोवा बनावटीची दारु वाहतूक करण्याऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्गच्या पथकाने अटकेची कारवाई करत 8 लाख 32 हजार 800 रुपये किमतीच्या दारूसह 38 लाख 32 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी जिल्हयातील सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांना सिंधुदुर्ग जिल्हयातील अवैध धंदयांचे समूळ उच्चाटन करुन अवैध धंदयांमध्ये गुंतलेल्या इसमांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिले होते.

त्यानुसार 08/08/2023 रोजी पहाटेच्या वेळी गोवा मुंबई हायवेवरुन फॉर्च्यूनर कार व स्विफ्ट कार यामधून गोवा बनावटीच्या दारुची अवैध वाहतूक गोव्याकडून मुंबईच्या दिशेने होणार आहे, अशी खबर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्गच्या पथकास मिळाल्याने पहाटे 04.30 वा. चे दरम्यान सापळा रचून फॉर्च्यूनर कार क्र. MH 01/BC/1616 व स्विफ्ट कार क्र. MH 07/AB/5354 हया गाडयांवर कायदेशीर कारवाई केली. त्यामध्ये 8 लाख 32 हजार 800 रुपये किमतीची गोवा बनावटीची दारु व 30 लाख रुपये किमतीच्या 2 कार असा एकूण 38 लाख 32 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाईमध्ये आरोपी चेतक भरत वाळवे (वय 27) रा. तिवरे वाळवेवाडी, ता. कणकवली आणि महेश्वर हनुमंत मोरे (वय 37) रा. कलमठ मोरेश्वरनगर, ता. कणकवली यांना अटक करण्यात आलेली असून पुढील तपास सावंतवाडी पोलीस ठाण्यातून होणार आहे.

सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, संदीप भोसले, पोलीस निरीक्षक व सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश कदम, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर, पोलीस नाईक चंद्रकांत पालकर, चंद्रहास नार्वेकर यांचे पथकाने सदर कारवाई केलेली आहे.