कोट्यावधींची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याला अटक..!

114

चेन्नई : दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री महालक्ष्मी आणि तिचे पती-निर्माते रवींद्र चंद्रशेखरन हे नेहमीच चर्चेत असतात. रवींद्र चंद्रशेखरन हा साऊथचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहे. मात्र आता चंद्रशेखरन याच्याशी संबंधित मोठी बातमी समोर येत आली आहे. त्यामुळे चंद्रशेखरनच्या अडचणीही वाढल्या आहेत. रवींद्र चंद्रशेखरनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. महापालिकेच्या घनकचऱ्याचे ऊर्जेत रूपांतर करण्याच्या व्यवसायाचा प्रस्ताव देऊन त्यानी एका व्यावसायिकाची फसवणुक केली आहे. त्यांनी व्यावसायिकाला तब्बल 15.83 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. रविंदरला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.