सिंधुदुर्गनगरी : गणेशोत्सवासाठी दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात साथरोगाचा फैलाव होऊ नये, यासाठी १५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन, बसस्थानके व तपासणी नाके असलेल्या १८ ठिकाणी वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली. जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने कामानिमित्त जिल्ह्याबाहेर राहत असतात. मुंबई, पुणे आदी शहरांत राहणाऱ्यांची संख्या जास्त आहे.





