Home ब्रेकिंग न्यूज रत्नागिरीत शिक्षक दिनानिमित्ताने रोटरी क्लबतर्फे शिक्षकांचा सत्कार..!

रत्नागिरीत शिक्षक दिनानिमित्ताने रोटरी क्लबतर्फे शिक्षकांचा सत्कार..!

60

रत्नागिरी : शिक्षक दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीने रोटरी इंडिया लिट्रसी मिशन अंतर्गत ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ कार्यक्रम साजरा केला. येथील स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात झालेल्या या समारंभात तालुक्यातील विविध शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून स. रा. देसाई अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य नेताजी कुंभार आणि रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष रोटे श्रीकांत भुर्के उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवयानी वाघधरे यांनी केले. तसेच रोटरीने केलेल्या विविध कामांची माहिती दिली. विशेष सन्मान म्हणून स. रा. देसाई अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य नेताजी कुंभार यांचा त्यांचेच विद्यार्थी आणि ज्येष्ठ रोटरी सदस्य हातखंबकर यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात त्यांची प्रदीर्घ ३३ वर्षे सेवा झाली आहे. त्यात त्यांना जिल्हा, राज्य अशा विविध पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत, तसेच त्यांच्याच घरातील १० मंडळी विविध ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

विविध शाळांतील ९ शिक्षकांचा सन्मान रोटरी अध्यक्ष श्रीकांत भुर्के, ज्येष्ठ सदस्य नमिता कीर, धरमसी चौहान, विनायक हातखंबकर, ज्येष्ठ शिक्षक रवींद्र इनामदार, प्राचार्य नेताजी कुंभार यांच्या हस्ते करण्यात आला. हे मान्यवर असे – प्रकाश कामेरकर (जिल्हा परिषद शाळा जांभरूण सड्ये), वहिदा बुद्धु (जिल्हा परिषद शाळा शिरगाव उर्दू), समृद्धी गोणबोरे (जिल्हा परिषद शाळा निवेंडी वरची), वृषाली हेळेकर (जिल्हा परिषद शाळा शिरंबाड), वैशाली झोरे (जिल्हा परिषद शाळा चिंद्रवली), संजना तारी (गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी), आनंद खांडेकर (पोतकर गुरुजी विद्यामंदिर, डोर्ले), इम्तियाज सिद्दिकी (मेस्त्री हायस्कूल रत्नागिरी), योगेश कदम (दामले विद्यालय, रत्नागिरी).