Home गोवा GOOD NEWS – हरमल पंचक्रोशी’चे आता ‘नर्सिंग स्कूल’- लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती.!...

GOOD NEWS – हरमल पंचक्रोशी’चे आता ‘नर्सिंग स्कूल’- लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती.! ; दरवर्षी १०० परिचारिका शिकून बाहेर पडणार..!

33

हरमल (गोवा) : हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाला कॉलेज ऑफ नर्सिंग सुरू करण्याची मान्यता मिळाली आहे. जीएनएम, एएनएम आणि बीएससी नर्सिंग, बारावी नंतर विद्यार्थ्यांना नीट परीक्षेनुसार दरवर्षी शंभर विद्यार्थ्यांना नर्सिंग विद्यालयात प्रवेश मिळणार आहे. दरवर्षी शंभर नवीन परिचारिका या विद्यालयातून बाहेर पडणार असून गोव्यातच नव्हे तर देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्या रोजगार मिळवू शकतात, अशी माहिती संस्थेचे चेअरमन तथा माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पंचक्रोशी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका स्मिता पार्सेकर, कॉलेज ऑफ नर्सिंग स्कूलच्या प्राचार्य पाऊल,आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. पार्सेकर म्हणाले की, हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाने हरमल पंचक्रोशी पूर्व प्राथमिक, प्राथमिक विद्यालय, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि व्होकेशनल स्टडीज, गणपत
पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन, तसेच विशेष मुलांच्या शिक्षणाची सोय या संस्थेने केली आहे. आणि आताच कॉलेज ऑफ नर्सिंग विद्यालय कार्यरत करत असताना एएनएम, जीएनएम साठी राज्य नर्सिंग कौन्सिलची शिवाय बीएससी नर्सिंगला गोवा विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे. हे नर्सिंग स्कूल बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे. ‘गोमेकॉमधून दरवर्षाला किमान सहाशे डॉक्टर तयार होतात, आणि त्यांना बाराशे परिचारिकांची आवश्यकता आहे.

दीड वर्षात नव्या इमारतीत स्थलांतर !

धारगळ येथे आयुर्वेद संस्थान, म्हापसा येथे खासगी तसेच जिल्हा हॉस्पिटल आहे. शिवाय गोवा मेडिकल कॉलेज आहे. या सर्वांशी संलग्न होऊन हे विद्यालय परिचारिका घडवणार आहे. त्या त्या हॉस्पिटलमध्ये परिचारिकांना प्रशिक्षण देण्यासाठीही त्यांच्या वाहतुकीची सोय केल्याचे पार्सेकर म्हणाले. या विद्यालयात एकूण सहा लॅबोरेटरीज आहेत. दीड वर्षात नवी इमारत उभारून कॉलेज ऑफ नर्सिंगचे स्थलांतर करण्यात येईल, असेही पार्सेकर म्हणाले.