पल्लेकेले: रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने सोमवारी पल्लेकेले स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नेपाळचा 10 गडी राखून पराभव केला. यासह भारताने आशिया कप-2023 च्या सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे.
या सामन्यात नेपाळने प्रथम फलंदाजी केली आणि 48.2 षटकात 230 धावा केल्या. भारताच्या डावाची केवळ 2.1 षटके पूर्ण झाली तेव्हा पाऊस आला आणि त्यानंतर टीम इंडियाला 23 षटकांत 145 धावांचे लक्ष्य देण्यात आले. भारताने हे लक्ष्य 20.1 षटकात पूर्ण केले.
भारताकडून कर्णधार रोहित शर्माने नाबाद 74 धावांची खेळी केली. त्याचवेळी त्याचा सलामीचा जोडीदार शुभमन गिलने नाबाद 67 धावा केल्या. यासोबत भारत आणि पाकिस्तानचे सुपरफॉरमध्ये स्थान निश्चित झाले आहे.
अ गटातून पाकिस्तानने पहिले स्थान पटकावले आणि दुसरे स्थान मिळवून भारत सुपर फोरसाठी पात्र ठरला. ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा सुपर फोरमध्ये पोहोचण्याचा मार्ग अद्याप खुला आहे.
6 सप्टेंबरपासून सुपर फोर फेरी सुरू होणार आहे. 10 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा भिडणार आहेत. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे.




