मतदानाचे प्रबोधन शालेय जीवनापासूनच व्हायला हवे .! ; गवाणकर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ॲड. संतोष सावंत यांचे प्रतिपादन.

136

सावंतवाडी : आपल्या देशाच्या लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत प्रभावी प्रक्रिया आहे. या प्रक्रिया शालेय,  महाविद्यालयीन जीवनापासूनच राबवायला हवेत , निवडणूक प्रक्रियेबाबतची कल्पना जागृत मतदार म्हणून असावी आणि यातून नेतृत्व गुण आणि प्रशासकीय कामकाज पद्धती कशी हाताळली जाते? याचा परिपूर्ण अभ्यास असणे फार महत्त्वाचे आहे. फक्त कॉलेजमधील पुस्तकी ज्ञान मिळवणे म्हणजे तो विद्यार्थी प्रगत झाला असे नाही, तर त्याला सर्व समाज व्यवस्थेतील आणि प्रशासकीय व्यवस्थेतील जाणं असणे गरजेचे आहे, येत्या 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे,  त्या धर्तीवर केंद्रीय निवडणूक व राज्य निवडणूक आयोगाने मतदार आणि मतदान प्रक्रियेबाबतची माहिती प्रत्येक शाळा कॉलेज महाविद्यालय आणि घरोघरी जाऊन दिली जात आहे. असे असतानाच लोकमान्य ट्रस्टच्या देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयाने आपल्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजावी, यासाठी आज शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला कॉलेजमध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवली. त्यासाठी मतदान केंद्र मतदान बॅलेट पेपर आणि प्रचार यंत्रणा अशी सर्व प्रक्रिया राबवत विद्यार्थी प्रतिनिधीसाठी मतदान दिवस साजरा केला.

देश, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी घटत चालली आहे. तरुणाई मतदान प्रक्रियेपासून आणि निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहत आहे. त्यांना पुढील काळात मतदानाचा हक्क प्रक्रिया समजावी, या उद्देशाने आजचा मतदार दिवस निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. यातून मतदान प्रक्रियेचे प्रबोधनही करण्यात आले.  2024 ची लोकसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी स्वतःहून मतदानासाठी पुढे यावे आणि आपले अमूल्य मत प्रदान करावे, यासाठी प्रात्यक्षिक म्हणून गवाणकर महाविद्यालयामध्ये आज विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक संपन्न झाली. या मतदानामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी व एक विद्यार्थिनी प्रतिनिधी अशी निवड होणार आहे. मतदान योग्य पद्धतीने पार पडले.  यामध्ये विद्यार्थ्यांना मतदान पद्धती कशी असते? कशा पद्धतीने आपण मतदान पूर्ण करतो? याची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना आज पाहता आली. या कॉलेजने अशी निवडणूक प्रक्रिया राबवून एक प्रकारे आगळावेगळा उपक्रमही राबवला.

सदर मतदान प्रक्रिया कार्यक्रमाचे उद्घाटन पत्रकार तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष ॲड.संतोष सावंत यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया अत्यंत महत्त्वाचे प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया प्रत्येक व्यक्तिला समजायला हवी, मतदानाचा हक्क पवित्र हक्क आहे, तो बजवायलाच हवा. आपण दिलेले अनमोल मत आपला हक्काचा प्रतिनिधी निवडत असतो. यामुळे विद्यार्थ्यांना मतदान किती महत्त्वाचे आहे व  मतदानामुळे आपण भारतासारख्या लोकशाही देशांमध्ये मतदान किती महत्त्वाचे आहे? हे सुद्धा महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य यशोधन गवस यांनी केले. आभार प्रा. साईप्रसाद पंडित यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. आनंद नाईक, अस्मिता गवस, शैलेश गावडे, मेधा मयेकर,अमर धोंड, संतोष सावंत, प्रवीण तुयेकर, महेश जाधव इतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.