सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील मदारी रोड उपरकर शूटिंग रेंजकडे जाणारा पूल कोसळला होता. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून नगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते. यावेळी मुख्याधिकारी यांनी स्वतः या भागाची पाहणी केली होती. यामुळे नागरिकांची होणारे गैरसोय लक्षात घेऊन नगरपालिकेने या पूलाचे दुरुस्तीचे काम आजपासून सुरू करण्यात आले. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व बांधकाम विभागाबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला शहराध्यक्ष सौ. राबिया आगा, तौसीब आगा, प्रशांत पाटणकर, कांचन उपरकर, नाना उपरकर, संजय नाईक, श्रीमती पटेल आदी नागरिक उपस्थित होते.
Home ब्रेकिंग न्यूज अखेर सावंतवाडीतील ‘त्या’ पूलाच्या दुरूस्तीला सुरूवात ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठपुराव्याला यश.!





