दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, सावंतवाडी यांचे ‘गुरुसेवा गौरव पुरस्कार’ सन २०२३ जाहीर.!

1257

सावंतवाडी : ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपक्रमशील व चांगले शैक्षणिक कार्य करणार्‍या शिक्षकांचा गुरुसेवा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. प्रत्येक तालुक्यातून दोन (एक प्राथमिक व एक माध्यमिक), तसेच विशेष काम करणार्‍या  शिक्षकांचा गौरव केला जातो. अंगणवाडी ते महाविदयालयीन उपक्रमशील शिक्षक – शिक्षिकांची निवड केली जाते.

यंदाचे जाहीर झालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे – 
सावंतवाडी – सौ. नेहा नरेंद्र सावंत ( जि.प.शाळा इन्सुली नं.१ ), श्री. किशोर अरविंद वालावलकर (कलंबिस्त हायस्कूल कलंबिस्त )

दोडामार्ग – श्री. दीपक नामदेव गवळी ( जि.प. शाळा साटेली भेडशी ), श्री. नंदकिशोर पांडुरंग म्हापसेकर, (माध्य. विदयालय, सोनावल )

वेंगुर्ला – श्री. सिताराम अर्जुन नाईक (जि. प.शाळा उभादांडा ), सौ. रेश्मा भालचंद्र चोडणकर (दाभोली हाय. दाभोली,)

कुडाळ – सौ. श्यामल चंद्रकांत धुरी ( जि.प. सरस्वती विदयालय कालेली ), सौ. दर्शना सुनिल वराडकर (कसाल हाय. कसाल )

मालवण – श्री. दीपक केशव गोसावी ( जि.प. शाळा धामापूर ) , सौ. दिव्यता दिनेश परब ( हिराबाई भा. वरसकर, विद्यामंदीर, वराड)

कणकवली – श्री. संजय गोपाळ सावंत ( जि.प. शाळा फोंडा), श्री. पी.जे कांबळे ( विद्यामंदीर हाय. कणकवली )

देवगड – श्री. दिनेश सुरबा दळवी , ( जि.प. शाळा जामसंडे नं.१) , श्री. अनिल देविदास घुगे, ( डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हाय. मुटाट )

वैभववाडी – सौ. ज्योती जयवंत पवार ( वि.भ. करुळ गावठण शाळा ), श्री. संतोष यशवंत मोहिते (बालभवन विदयामंदिर मौदे)

अंगणवाडी ते महाविदयालय विशेष सन्मान – 
श्री. कमलाकर सीताराम ठाकूर ( केंद्रप्रमुख सावंतवाडी), श्रीम. अर्चना एकनाथ आंबेलकर , (अंगणवाडी शिक्षिका ), सौ. माधवी मंगेश मसके (कुडाळ), सौ. अनुराधा हरिश्चंद्र पवार (अंगणवाडी शाळा नं.२ सावंतवाडी ), श्री. महेश लाडू सावंत, ( तळवडे नं.३ ), श्री. अरविंद नारायण सरनोबत , ( जि.प. शाळा माडखोल- धवडकी ), श्री. भिवा केशव सावंत, (आडेली नं.१ ) श्रीम. पूनम यशवंत खोराटे ( बोडदे ), श्री. उदय वामन शिरोडकर ( केंद्रप्रमुख), श्री. शरद अर्जुन नारकर  ( नाधवडे नं.१), सौ. अश्विनी आनंद राणे (अंगणवाडी इन्सुली डोबाची शेळ), श्रीम. आनंदी रघुनंदन घोगळे (डी. एड. कॉलेज, मालवण)

यंदाचे हे बारावे वर्ष आहे. पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र, शाल श्रीफळ, स्मृतिचिन्ह व ग्रंथ असे आहे. कार्यक्रमाची तारीख नंतर कळविण्यात येईल, असे निवड समिती सदस्य श्री. भरत गावडे, श्री. विठ्ठल कदम, श्री. म. ल.देसाई, श्री.अजय सावंत, श्री. आर . बी. गावडे, श्री. नारायण नाईक यांनी कळविले आहे. सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे शालेय शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर व श्री. राजन पोकळे व मित्र मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.