‘या’ गावानजीक बर्निंग कारचा थरार..!; कारचे अतोनात नुकसान.

71

रोहा : शशिकांत मोरे

रोहा – रेवदंडा – मुरुड या राज्य मार्गावर शेडसई गावानजीक सायंकाळ दरम्यान स्विफ्ट कारने अचानक पेट घेतल्याने बर्निंग कारचा थरार रस्त्यावरील वाहन चालकासह पादचाऱ्यांना अनुभवायला मिळाला.मात्र या घटनेत कोणतीही जिवित नाही झाली नसल्याने अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

मारुती कंपनीची स्विफ्ट कार क्रमांक एम एच ०४ डी आर ३८८२ या कार मधून एक परिवार पर्यटन करण्यास मुरुड काशीद बीच वर गेले होते तसेच ते पुन्हा माघारी रोहाकडे येत असताना शेडसई,गोफण नजीक हॉटेल योगिता हीरा समोर रात्री आठच्या सुमारास आली असता चालत्या कारने अचानक पेट घेतला. सुरुवातीला पांढर्या रंगाचा धूर आल्यानंतर अचानक लाल रंगाच्या ज्वाला बाहेर येऊ लागल्या.यामुळे याठिकाणी चांगलीच खळबळ उडाली.मात्र कार मधील कुटुंबाच्या प्रसंगावधानामुळे गाडीतून प्रवास करणारे कुटुंब हे सुखरूप बाहेर आल्याने सुदैवाने जिवित हानी झाली नाही.
पेटती कार विझविण्यासाठी हॉटेल मध्ये काम करणारे कर्मचारी तसेच गावातील नागरिकांनी कार विझवण्यासाठी अधक परिश्रम घेतले आणि अखेर आग आटोक्यात आणली.मात्र पेट घेतल्याने कारचे अतोनात नुकसान झाले आहे.