बांद्यात ९ सप्टेंबर रोजी भव्य दहीहंडी महोत्सव, लाखोंची बक्षीसे.! ; प्रसिद्ध गायकांची मेजवानी, भाजपचे आयोजन.

51

बांदा : बांदा मच्छीमार्केट येथील भव्य पटांगणावर भाजपकडून आयोजन केलेल्या दहिहंडी उत्सवाकरीता भाजपची नियोजन बैठक बांदा येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात संपन्न झाली.
बांदा मच्छी मार्केटच्या भव्य पटांगणावर 9 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजता भाजपकडून दहीहंडी उत्सव आयोजन करण्यात आलेला आहे. दहीहंडी फोडणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या संघाला एक लाख 11 हजार 1111 रुपये तर द्वितीय संघाला 55 हजार 555 बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच पाच थर लावणाऱ्या संघाला 5 हजार रुपये सहा थर लावणाऱ्या संघाला 6 हजार रुपये सात थर लावणाऱ्या संघाला 7 हजार रुपये आठ थर लावणाऱ्या संघाला 8 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

दहीहंडी उत्सवाच्या थराराचे युवा मराठी अभिनेत्री मृण्ययी देशपांडे, युवा पार्श्वगायिका कविता राम, युवा पार्श्वगायक स्वप्निल गोडबोले हे खास आकर्षण आहे. सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध वृत्त निवेदक ऋषिकेश देसाई उपस्थित राहणार आहे. नियोजन करत असताना वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या असून त्याप्रमाणे जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. यावेळी राजन तेली यांनी मार्गदर्शन करत असताना भाजपची नेते मंडळीही उपस्थित राहणार असून ज्या समित्या गठीत केल्या आहेत त्याना जी जबाबदारी दिली आहे ती त्यांनी पूर्ण क्षमतेने पूर्ण करण्यासाठी सक्रिय राहावे, असे आवाहन केले. तसेच बांद्यात प्रथमच दहीहंडी उत्सव आयोजन एवढ्या मोठय़ा प्रमाणात करण्यात आले असून यात युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही केले.

दहीहंडी उत्सवाच्या नियोजन करिता भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब, आंबोली मंडळ प्रभारी अध्यक्ष दादू कविटकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, माजी नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, एकनाथ नाडकर्णी, मधुकर देसाई, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, श्वेता कोरगावकर, शितल राऊळ, बांदा मंडल उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, सिद्धेश महाजन, प्रथमेश तेली तसेच बांदा शहरातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.