‘गोवारी हत्याकांड घडलं तेव्हा..!’ ; फडणवीसांची शरद पवारांच्या जालना दौऱ्यावर टीका.!

68

मुंबई : जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनात शुक्रवारी दगडफेक झाल्याचा दावा करून पोलिसांकडून लाठीमार झाला. या घटनेत अनेक पोलिस आणि ग्रामस्थ जखमी झाले. यानंतर राज्याचे राजकीय वातावरण तापले असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे आज (शनिवार) जालन्यातील आंदोलनस्थळाला भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे. यादरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शरद पवारांच्या या जालना दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे.जालन्यात घडलेल्या घटनेबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, दुर्दैवाने पोलिसांना घेरून दगडफेक करण्यात आली. जवळपास पोलीस अधिकाऱ्यांसह १२ पोलीस जखमी झाले. त्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्ज करताना देखील कोणी गंभीर जखमी होणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात आले असे फडणवीस यांनी सांगितले.

तेव्हा पाहायला देखील गेले नाहीत…

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, आजच्या शरद पवारांच्या जालना दौऱ्यावर बोलताना फडणीस म्हणाले की, पवारसाहेब मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याकांड झालं आणि त्याठिकणी ११३ गोवारी समाजाचे लोक मृत्युमुखी पडले. पवारसाहेब पाहायला देखील गेले नाहीत आणि राजीनामा देखील दिला नाही. त्यामुळे आता पवार साहेबांच्या जवळच्या लोकांनी त्यांना सोडून आमच्यासोबत सरकार तयार केल्याने ते नाराज, चिडलेले आणि व्यथित आहेत. त्यामुळे ते असे अरोप करत आहेत मी त्यांना उत्तर देणार नाही, असे फडणवीस म्हणाले आहेत.

काही कारण नसताना लाठी हल्ला केला. लोकांनी मला सांगितलं की, काही पोलिस सांगत होते की, आम्हाला कळतंय की यांची (आंदोलनकर्ते) मागणी रास्त आहे. पण आम्हाला कळतंय की आपण हे करू नये. पण वरून सुचना आहेत त्यामुळे आम्हाला केल्याशिलाय गत्यंतर नाही. आज राज्यात गृहखात्याची सुत्रे ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून समाजाच्या अन्य घटकाबाबत किती अतिरेकी भूमिका घेतली जाते याचं हे उदाहरण आहे. या लाठी हल्ल्याचा मी निषेध करतो अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली.