नशामुक्त भारतासाठी तरुणांचे व्यसनांपासून संरक्षण करावे ! ; नशाबंदी मंडळातर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन.

36

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यसनांचे प्रमाण वाढत असून, अनेक तरुण मुले व्यसनांच्या आहारी जाऊन आपले जीवन उध्वस्त करत आहे याचा कुटुंबावर आणि समाजावर विदारक परिणाम होताना दिसत आहे त्याला आळा घालायचा असेल तर ठोस नियोजनपूर्वक जनजागृती करावयास हवी. यासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत Youth against lTD Club सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक महाविद्यालयात हा क्लब स्थापन करून प्रत्येक महाविद्यालयातील तर वर्षी दहा दहा मुले सहभागी करावे. जेणेकरून व्यसनांच्या विरोधात कार्य करणारी व व्यसनांपासून दूर राहणारी युवकांची फौज निर्माण करता येऊ शकते. तसेच नशा मुक्त भारत अभियान गांभीर्याने राबविण्याची गरज आहे. याचे नियोजनसुद्धा गाव पातळीवर करून जिल्ह्यातील तरुणांचे व्यसनांपासून संरक्षण करावे, अशी मागणी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबईच्या कोकण विभागीय संघटक प्रमुख अर्पिता मुंबरकर यांनी नशाबंदी मंडळाच्या वतीने तसेच सिंधुदुर्गातील जनतेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुट्टे यांना, समाज कल्याण अधिकारी विनायक ठाकूर यांना, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, तसेच महिला अत्याचार निवारण कक्षाच्या सर्व पोलीसांना राखी बांधून समाजाचे विशेषतः तरुणांचे व्यसनांपासून रक्षण करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.