जय हो…! भारताचा पहिला स्वदेशी अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु ; पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन..!

40

नवी दिल्ली : भारतातील पहिले देशातच निर्माण करण्यात आलेले अणुऊर्जा प्रकल्प Nuclear power plant पूर्ण क्षणतेने सुरु झाले आहे. गुजरातच्या काक्रापार येथे हा प्रकल्प असून याची क्षमता ७०० MV आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावरुन याची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.

काक्रापार अॅटोमिक पॉवर प्रोजेक्टचे ३० जून रोजी व्यायसायिक काम सुरु झाले होते.पण, प्रकल्प आतापर्यंत ९० टक्के क्षमतेने चालत होता. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करुन म्हटलं की, ‘देशातील महिला स्वदेशी ७०० MWe क्षमतेचा काक्रापूर अणुऊर्जा प्रकल्प युनिट-३ गुजरातमध्ये पूर्ण क्षमतेने सुरु झाला आहे. हा देशातील अशा प्रकारचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. आपले वैज्ञानिक आणि अभियंत्यांचे याबाबात अभिनंदन.’

एनपीसीआयएल ७०० MW क्षमतेचे दोन प्रेझराईज हेवी वॉटर रिअॅक्टर माहितीनुसार, एनपीसीआयएल संपूर्ण देशात ७०० MW क्षमतेचे १६ अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. यासाठी आर्थिक तरतूद आणि प्रशासकीय मंजुरी मिळाल्या आहेत. सध्या ७०० MW क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पांचे  राजस्थानच्या रावतभाटा (RAPS 7 and 8) आणि हरियाणातील गोरखपूर (GHAVP 1 and 2) येथे निर्मिती कार्य सुरु आहे. काक्रापार येथे उभारत आहेत. याआधी २२० MW क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प येथे उभारण्यात आलेले आहेत. सूत्रांनुसार काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प ९७.५६ टक्के सुरु झाला आहे.