‘ते’ फरार आरोपी बांदा पोलिसांच्या ताब्यात.! ; इन्सुली काजू फॅक्टरी चोरी प्रकरण.!

32
  1. बांदा : काही दिवसांपूर्वी इन्सुली खामदेव नाका येथील शिवदुर्गा काजू फॅक्टरीमध्ये करण्यात आलेल्या चोरी मधील संशयित असलेल्या दोन फरारी आरोपींना बांदा पोलिसांनी वडोदरा-गुजरात येथे पकडण्यात यश आले. या चोरी प्रकरणात अवघ्या १० तासाच्या आतचं पहिल्या संशयित आरोपी कन्हैया मनोरंजन गिरी याला स्थानिक गुन्हा अन्वेक्षण ताब्यात घेतले होते.
    फरारी दोघेही संशयित रेल्वेने दिल्लीला निघून जाण्याच्या तयारीत होते. याप्रकरणी कन्हैया रामनाथ गुप्ता (वय २६, रा. जारोदा मांजरा दिल्ली), व कादिर खान अविद अच्छी (वय २६, रा. बदलापूर, दिल्ली) यांना गुजरात येथे जाऊन बांदा पोलिसांनी ताब्यात घेतले. संशीयतांकडून चोरीचा काही मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आले आहे. संशयितांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता २ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.
    बांदा सहा. निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर भोसले, हवालदार संजय हुंबे,शिपाई प्रसाद पाटील, शिपाई राजेंद्र शेळके, राजाराम कापसे, तात्या कोळेकर यांच्या पथकाने गुजरात मध्ये जाऊन दोघे संशयिताना ताब्यात घेऊन बुधवारी रात्री उशिरा त्यांना बांदा येथे आणण्यात आले