सावंतवाडी : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या मुंबईकरांच्या गर्दीमुळे रेल्वेच्या इतर गाड्यांबरोबरच वंदे भारत एक्स्प्रेसच्या फेऱ्यांनाही कोकणवासीयांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मुंबईतून गावी येणाऱ्या गणेशभक्तांनी १५ सप्टेंबरसाठी ‘वंदे भारतला पसंती दिली आहे. त्यामुळे या गाडीच्या प्रतीक्षा यादीवरील बुकिंग २०० पेक्षा अधिक झाले आहे. मडगाव ते मुंबई मार्गावर दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला कोकणसह गोव्यातील प्रवासी जनतेकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.





