मुंबई : बारावी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आता परदवीला प्रवेश मिळणार आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांना पदवीच्या रिक्त जागांवर प्रवेश देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश जारी केले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटलांनी आदेश जारी केला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इयत्ता १२ वी ) पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवार दिनांक २८ ऑगस्ट, २०२३ रोजी जाहीर करण्यात आला.





