बांदा : येथील गोगटे वाळके महाविद्यालयाच्या शिक्षक पालक विभागाच्या वतीने शुक्रवार दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात शिक्षक पालक स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शेती बागायती आणि उद्योग यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. पी. सणस हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तरी सर्व पालक, ग्रामस्थ, शेतकरी आणि नवोदित शेती प्रेमी यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. या शेतीविषयक कार्यशाळेसंबंधी अधिक माहितीसाठी शिक्षक पालक विभागाचे समन्वयक प्रा. रमाकांत गावडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गोगटे वाळके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले आहे.





