जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत कनेडी हायस्कूलचा डंका ..!

30

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा वार गुरुवार दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी विद्यामंदिर कणकवली येथे जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्या मंदिर कनेडी प्रशालेतील संघांनी सहभाग घेतला त्यामध्ये मुलांच्या संघामध्ये कुमार पंकज चव्हाण (इयत्ता बारावी सायन्स) जिल्हास्तरीय सेबर प्रथम क्रमांक व इपी द्वितीय क्रमांक, कुमार वेदांत धनवटे (इयत्ता नववी) जिल्हास्तरीय सेबर द्वितीय क्रमांक, कुमार लतिकेश धनवटे (इयत्ता सहावी) फोईल जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक इपी तृतीय क्रमांक तसेच मुलींच्या संघामध्ये कुमारी दुर्वा सरुडकर (इयत्ता सहावी) सेबर जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळविला या सर्व विद्यार्थ्यांचे विभागीय स्पर्धेसाठी निवड व पात्र ठरले आहेत.

सदर यशाबद्दल कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन आर. एच. सावंत व सर्व सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक  बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना प्रशालेचे पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक बयाजी बुराण यांचे मार्गदर्शन लाभले.