सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह आकर्षक पैठणी जिंका..! ; उद्या महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे मालवणात आयोजन.!

45

मालवण : येथील मालवणी संस्कृती व वारसा मंडळ या संस्थेतर्फे दरवर्षी प्रमाणे नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्त महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा उद्या दि. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या महिलांसाठी सोन्या चांदीच्या दागिन्यांची आकर्षक बक्षिसे पैठणी साडी देण्यात येणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मालवण मेढा येथील आर्यन होम स्टे येथे पत्रकार परिषद झाली.