एकमेकांना संपवण्याचे काम करताहेत भाजपचे पदाधिकारी .! ; परशुराम उपरकर यांचा आरोप.

54

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत कलह असून दोन ते तिन गट आपापसात एकमेकांना संपवण्याचे काम करत असल्यानेच भाजपच्या काही नेत्यांना मोर्चा काढून आपले वरिष्ठ नेते काम करत नसल्याचे दाखवण्यात आले, असा खळबळजनक आरोप मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केला. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते.

ते पुढे म्हणाले, मंत्री राणे यांनी कोकणातील टोलमुक्त करू, असे आश्वासन जनतेला दिले होते. मात्र ते अद्याप झाले नसून रस्ता पूर्ण होणे आधीच टोल वसुली सुरू आहे, असाही आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, प्रकाश साटेलकर, मंदार नाईक, निलेश देसाई, विजय जांभळे, अभि पेडणेकर, सागर येडगे, रमेश शेळके, प्रमोद गावडे, स्वप्नील जाधव आदी उपस्थित होते.