बांदा : इन्सुली खामदेव नाक्यावरील गणेश मंदिरासमोर काजू दुकानात काल शनिवारी मध्यरात्री चोरी झाली आहे. यात सुमारे रोख रुपये 48000 व एक आठ हजाराचा किमतीचा मोबाईल चोरट्यानी लंपास केला असून चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.
याबाबतची तक्रार दिगंबर बोंद्रे यांनी बांदा पोलीस ठाण्यात दिली आहे. बांदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर भोसले व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून पुढील तपास करत आहेत. त्यानंतर ओरोसवरून ठसे व स्वान बोलवण्यात आले. बांदा पोलीस पुढील तपास करत आहेत.





