डेपोमध्ये बसेस नसल्यानं ST चं वेळापत्रक कोलमडलं…!

कुडाळ : कुडाळ आगाराचे वेळापत्रक पुर्णपणे कोलमडले असल्याने गावा गावात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असल्याने, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला कुडाळ डेपो जबाबदारी घेईल काअसा सवाल शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केलाय.

कुडाळ ते कोचरा श्रीरामवाडी एसटी बस गेले दोन दीवस आली नसल्याने आज कुडाळ आगाराच्या अधिका-यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी, युवासेनेचे राजु गवंडे, नेरूर शिवसेना उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, साळगाव शिवसेना विभागाचे संदीप कोरगावकर यांच्या समवेत निवेदन देताना गंभीर बाब उघड झाल्याच बंगे यांनी सांगितलं.

एसटी गाड्या कुडाळ डेपोमध्ये उपलब्ध नसल्याने लांब पल्ल्याच्या व गावा गावात जाणा-या बसेस रद्द करण्यात आल्याची माहिती उपस्थित अधिका-यांनी दीली असल्याची माहिती बंगे यांनी दिली. पासिंगच्या नावाखाली आर टी ओ कडे बसेस उभ्या करुन विद्यार्थी व प्रवाशांचे हाल कशासाठी असा प्रश्न बंगे यांनी उपस्थित करुन कुडाळ ते कोचरा श्रीरामवाडी बस गेले दोन दीवस आली नाही. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानास जबाबदार कोण ? अशा प्रश्नांचा भडीमार करत येत्या दोन दिवसांत एसटी बसेस पुर्ववत सुरु करा अन्यथा शिवसेनेच्यावतीने कोणत्याही क्षणी आंदोलन करु असा इशारा बंगे यांनी दिला.