संगमेश्वर : तालुक्यातील कसबा गावचे तरुण उद्योजक अशोक साळवी यांना महाराष्ट्र राज्य खादीग्रामउद्योग व मेघास्रेय संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामोउद्योजक भरारी पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामउद्योजक मंडळ व शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून पारंपlरिक कारागीर नव तरुण, महिलांउद्योजकाना नवीन संधी उपलब्ध करुन दिली जाते. मंडळाच्या वतीने यशस्वी उदयोजकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे म्हणुन मंडळ व मेघाश्रय संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी ग्रामोउद्योजक भरारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
या वर्षी हा मान संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील कसबा गावचे सुपुत्र युवा उद्योजक श्री.अशोक साळवी यांना या पुरस्कार जाहीर झाला असल्याचे पत्र मंडळाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी श्री, बिपीन जगताप यांनी दिले आहे. पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार ता.29 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 4 वाजता राजभवन मंत्रालय मुंबई येथे महामाहीम राज्यपाल महोदय यांच्या हस्ते होणार आहे.
अशोक साळवी यांना ग्रामोउद्योजक भरारी पुरस्कार जाहीर झाल्याचे कळताच चिपळूण संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम यांनी भ्रमण ध्वनी वरुन संपर्क करुन अशोक साळवी यांचे अभिनंदन केले आहे. तसेच जिल्ह्यातून अशोक साळवी यांचे अभिनंदन होत आहे. त्यांना यापूर्वी खादी ग्रामउदयोग पुरस्कार, जिल्हा उदयोग केंद्र पुरस्कार, समाज भूषण पुरस्कार मिळाले असून आता ग्रामोउद्योजक भरारी या मानाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
.





