युवा सेनेची सामाजिक बांधिलकी ; निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात उशी वाटप!

40

सावंतवाडी : तालुक्यातील निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे युवासेनेच्या माध्यमातून रुग्णालयात उशांची (Pillow) आवश्यकता असल्याने युवासेना उपजिल्हाधिकारी सागर सोमकांत नाणोसकर आणि डॉ. मस्के मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली. यावेळी शाखा प्रमुख संदीप बाईत, युवासेना विभाग प्रमुख रोहन मल्हार, उपविभाग प्रमुख सुरज डिचोलकर, निरवडे युवासेना शाखा प्रमुख मधुकर भाईडकर, युवासेना शाखाप्रमुख मनोहर पारकर, रोहित परब, राजेश भाईडकर, दिनेश पेडणेकर, मनीष मल्हार, तुषार शेटकर, रोशन मल्हार, दत्ता बाई, प्रसाद पालकर, ग्रामीण रुग्णालयाचे सर्व डॉक्टर, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.