बांदा : कास उपसंरपंच गजानन नारायण पंडीत यांचे आज गोवा बांबोळी येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. पंडीत हे यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य होते. सध्या ते उपसंरपंच म्हणून कार्यरत होते. 15 ऑगस्ट रोजी अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी गोवा बांबोळी येथे दाखल करण्यात आले होते. अखेर आज उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहीत मुलगी, सुन, तीन भाऊ असा मोठा परीवार आहे.





