कुडाळ : पिंगुळी गोंधयाळेवाडीमध्ये रात्रीच्या सुमारास दारुच्या शोधात फिरणाऱ्या एमआयडीसीमधील परप्रांतीय कामगारांना मनसेचे माजी कुडाळ उप तालुकाध्यक्ष दीपक गावडे आणि जगन्नाथ गावडे यांनी रात्री 8 नंतर कंपनीच्या गेटच्या बाहेर कामाशिवाय न येण्याची सक्त ताकीद दिली. तसेच मालक आणि मुकादमानां देखील निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांचे आधारकार्ड आणि फोटो कुडाळ पोलीस ठाण्यात जमा करण्याचे सूचना देखील पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.





