नवी दिल्ली : भारताचं मिशन मून चांद्रयान – 3 हळूहळू आता अखेरच्या टप्प्यात पोहोचलं आहे. भारतासह जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागून राहिलं आहे. आता लॅंडींगसाठी काऊंटडाऊन सुरू झालं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 चा लँडर २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजून ०४ मिनिटांनी उतरणार असल्याचं सांगितलं आहे. लॅंडींग यशस्वी झाल्यास भारत अशी कामगिरी करणारा जगातला चौथा देश असेल. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने हा विक्रम केला आहे. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, चंद्रावर चांद्रयान ३ उतरवण्यासंबंधी महत्त्वाचा निर्णय बुधवारी लडिंगच्या आधी दोन तास घेतला जाणार आहे. जाहिरातचांद्रयान ३ च्या लँडर मॉड्यूलने चांद्रयान 2 च्या ऑर्बिटरशी यशस्वीपणे कम्युनिकेशन केलं आहे.
त्यासोबतच एलएचडीसीकडून घेतलेले चंद्राचे फोटोही शेअर करण्यात आले आहेत. सोमवारी दुपारी तीन वाजचा इस्रोने माहिती दिली की, चांद्रयान 3 च्या लेंडरने चांद्रयान 2 च्या ऑर्बिटरसोबत संपर्क साधला आहे. सोमवारी इस्रोने एलएचडीएसी कॅमेऱ्याने कॅप्चर केलेले फोटो शेअर केले होते. चंद्राचे जवळून टिपलेले हे फोटो लेंडिंग क्षेत्र निश्चित करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
चांद्रयान 2 जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलं?
‘चांद्रयान-3’ मोहिमेशी काय आहे खास कनेक्शनचांद्रयान ३ चंद्रावर उतरण्याच्या क्षणाचे बुधवारी लाइव्ह प्रक्षेपण होणार आहे. सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी यचे प्रक्षेपण सुरू होईल. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याशी चर्चा केली. तसंच त्यांना २३ ऑगस्टला चांद्रयान ३ चंद्रावर उतरणार आहे यासंबंधीची स्थिती आणि तयारी यांचीही माहिती दिली. सर्व सिस्टिम व्यवस्थित काम करत असून बुधवारी काही विपरित घडण्याची शक्यता नाही. पुढच्या दोन दिवसात चांद्रयान ३ वर कटाक्षाने लक्ष ठेवले जाईल. लैंडिंगच्या आधी दोन दिवसाची प्रक्रिया लोड केली जाणार आहे अशी माहिती सिंह यांना देण्यात आली होती. जाहिरातचांद्रयान ३ लेंडर हा चांद्रयान २ ऑर्बिटर आणि आयडीएसएन दोन्हींशी संपर्क साधू शकतो. विक्रम लैंडरसोबत २६ किलो वजनाचा प्रज्ञान रोव्हरसुद्धा आहे. इस्रोचे अहमदाबादचे संचालक निलेश एम देसाई यांनी सांगितले की, चंद्रावर लैंडिग करण्याचा निर्णय बुधवारी अधिकृत लैंडिंगच्या दोन तास आधी घेण्यात येणार आहे. २३ ऑगस्टला चांद्रयान उतरण्याआधी दोन तास लँडर मॉड्यूल व्यवस्थित असल्याचं आणि चंद्रावरील परिस्थिती लैंडिंगसाठी योग्य आहे की नाही यावर निर्णय घेतला जाणार आहे. जर काही अडचण निर्माण झाली तर लैंडिंग २७ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात येईल. कोणत्याही अडथळ्याशिवाय लैंडिंग करण्याचे इस्रोचे ध्येय आहे.





