गणेश चतुर्थीपूर्वी समस्या दूर करून सुविधा द्या! ; मालवण शहर भाजपची मागणी .

44

मालवण : गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच शहरातील वीज समस्याही दूर कराव्यात. या मागण्यांबाबत मालवण शहर भाजपच्या वतीने मालवण नगरपरिषद प्रशासन व विद्युत महामंडळ अधिकारी यांचे मालवण शहर भाजपच्या वतीने सोमवारी लक्ष वेधण्यात आले. भाजप शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, पूजा करलकर यांनी पालिका व वीज प्रशासन यांसमोर शहरातील समस्या मांडल्या