मुंबई : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सुभेदार सिनेमा नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या पराक्रमावर आधारीत असणार आहे. दिग्पाल लांजेकरच्या शिवराज अष्टकमधील हा पाचवा सिनेमा आहे. दिग्पालचे याआधीचे शिवराज अष्टकमधील चारही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. अशातच सुभेदार सिनेमाने रिलीजआधीच एक नवीन रेकॉर्ड केलाय.
सुभेदार सिनेमाचा नवीन रेकॉर्ड, ठरला पहिलाच मराठी सिनेमा
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार सिनेमाची उत्कंठा शिगेला आहे. अशातच सिनेमाच्या टीमने सर्वांना आनंदाची बातमी दिलीय. “प्रदर्शनाआधीच बुक माय शो वर 40K+ इंटरेस्टेड लाईक्स मिळालेला पहिला मराठी चित्रपट ‘सुभेदार’ !” हा पहिला मराठी सिनेमा ठरलाय. अशाप्रकारे ४० हजारांहून अधिक प्रेक्षक रिलीजआधीच सुभेदार सिनेमा पहायला उत्सुक आहेत. Book My Show वर असा रेकॉर्ड करणारा सुभेदार हा पहिलाच मराठी सिनेमा ठरलाय.
मरीन ड्राई्व्हवर सुभेदार सिनेमाचं भन्नाट प्रमोशन
‘सुभेदार’ चित्रपटाची टीम आज रविवारी सकाळी मरीन्स ड्राईव्हवर गेली होती. तिथे सुभेदार सिनेमाच्या टीमला भेटायला असंख्य फॅन्सनी गर्दी केली. यावेळी चिन्मय मांडलेकर, विराज कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र अशा सिनेमातील कलाकारांनी तरुणाईसोबत गाण्यांवर तरुणाईने ठेका धरला. या डान्सचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत चिन्मय मांडलेकर आणि सिनेमाचे इतर कलाकार भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सुद्धा सर्व टीमसोबत उपस्थित होते.
‘सुभेदार’ २५ ऑगस्टला भेटीला
‘सुभेदार’ सिनेमा १८ ऑगस्टला रिलीज होणार होता. सिनेमाचं सध्या प्रमोशन जोरात सुरु आहे. पण रविवार रात्री अचानक सुभेदार सिनेमाच्या टीमने जाहीर केलं की, सिनेमा १८ ऑगस्टला रिलीज होणार नाही.
काही तांत्रिक गोष्टी आपल्या हातात नसतात. पण अडचणींना न घाबरता आम्ही सिनेमा तुमच्या भेटीला आणणारच आहोत. त्यामुळे तांत्रिक अडचणींवर मात करुन आम्ही सिनेमा २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहोत.
अशाप्रकारे ‘सुभेदार’ सिनेमा १८ ऑगस्ट नव्हे तर २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





