घुमडे येथे जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धा.! ; श्रावणधारा महोत्सवानिमित्ताने २९ ऑगस्ट रोजी आयोजन.

40

मालवण : श्री देवी घुमडाई मंदिर घुमडे येथे श्रावण मास निमित्ताने घुमडे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष उद्योजक दत्ता सामंत पुरस्कृत श्रावणधारा महोत्सव या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन दर मंगळवारी करण्यात आले आहे. या निमित्ताने मंगळवार २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास रु. ७,७७७, द्वितीय क्रमांक रु. ५,५५५ तर तृतीय क्रमांक रु. ३,३३३ पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी ५०० रु. प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. स्पर्धक संघांनी आपली नाव नोंदणी घुमडे ग्रामस्थ मंडळ सचिव भाऊ सामंत मोबा : 9145381953 यांच्याकडे २५ ऑगस्ट पर्यत करावी. असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.