कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा गुणवंतांची खाण आहे. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक महान रत्नांनी देशपातळीवर आपला ठसा उमटविला आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत जिल्ह्याची गुणवत्ता राज्यात अव्वल दर्जाची आहे. मात्र असे असताना स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत आमच्या मुलांना अद्यापही समाधानकारक यश मिळविता आले नाही, अशी खंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील यांनी कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात आयोजित कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली.

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग यांच्यावतीने रविवारी कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रा. पाटील बोलत होते.
यावेळी कुडाळ तालुक्यातील चर्मकार समाजातील सन 2022 – 23 या शैक्षणिक वर्षात स्कॉलरशिप, नवोदय परीक्षा, इयत्ता दहावी, इयत्ता बारावी, पदवी, पदविका, पदव्युत्तर परीक्षा विशेष उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच सेवानिवृत्त झालेले कर्मचारी व अधिकारी वर्ग तसेच विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुडाळ तालुक्याचे अध्यक्ष मनोहर सरमाळकर होते. तर प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित जाधव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, संचालक आत्माराम ओटवणेकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश चव्हाण, ॲड. अनिल निरवडेकर, नायब तहसीलदार प्रदीप पवार, यांच्यासह प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून परफेक्ट अकॅडेमीचे चेअरमन प्रा. राजाराम परब व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक रुपेश पाटील उपस्थित होते. प्रा. राजाराम परब व प्रा. रूपेश पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. रूपेश पाटील पुढे म्हणाले आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा साहित्यिकांच्या जिल्हाबरोबरच अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखण्यात यावा, यासाठी संपूर्ण जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांची क्रांती करण्याचा मानस आहे. यासाठी येथील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे. आमची मुलं गुणवंतांची खाण आहेत, मात्र उच्च शिक्षणात आणि स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आपण मागे आहोत, हे देखील तेवढेच सत्य आहे. असेही प्रा. पाटील यांनी नमूद केले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर पाताडे, सिंधुदुर्ग जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर आंबेकर, जिल्हा सहसचिव सुभाष बांबुळकर, भवन समिती सहप्रमुख के. टी. चव्हाण, उदय शिरोडकर, भवन समिती प्रमुख श्रीराम चव्हाण, कुडाळ तालुका मार्गदर्शक राजन वालावलकर, जिल्हा सदस्य प्रिया आजगावकर, जिल्हा सदस्य ॲड. राजीव कुडाळकर, कुडाळ तालुका सल्लागार रामदास चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन कुडाळ तालुका कार्यकारिणीचे सचिव रत्नदीप जाधव, कोषाध्यक्ष मधुकर चव्हाण, उपाध्यक्ष साधना चव्हाण, राजन चव्हाण, संतोष चव्हाण, प्रमोद आजगावकर, सहसचिव रश्मी वालावलकर, केतन शिरोडकर, प्रकाश तेंडोलकर, राजेश चव्हाण, तसेच सदस्य प्राध्यापक सुभाष बांबुळकर, देविदास चव्हाण, सुरेश पिंगुळकर, लक्ष्मण पावसकर, नरेंद्र चव्हाण, प्रिया आजगावकर, सुजाता जाधव, गजानन बांबुळकर, नितीन बांबर्डेकर, दत्ताराम कसालकर, अविनाश अणावकर, गणपत चव्हाण, बाळकृष्ण चव्हाण, मधुकर जाधव, संतोष चव्हाण , बापू हुमरमळेकर, दीपक चव्हाण, सुप्रिया कसलकर व कायदेशीर सल्लागार ॲड. राजीव कुडाळकर यांनी केले. प्रास्ताविक रत्नदीप जाधव यांनी तर सूत्रसंचालन प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी केले.





