उपमुख्यमंत्री फडणवीस जपान दौऱ्यावर रवाना ; मिळणार शासकीय अतिथीचा विशेष दर्जा!

38

मुंबई : जपान सरकारच्या निमंत्रणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ५ दिवसांच्या जपानला दौऱ्यावर आहेत, महाराष्ट्र आणि जपानच्या मैत्रीसंबंधांच्या दृष्टीने या दौऱ्यात प्रयत्न होणार आहे. त्याचबरोबर उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील काही प्रकल्प, सामंजस्य करार आणि सहकार्य यासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे. जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जायका) कडून मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य मिळवून विविध प्रकल्प मार्गी लावण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. या दौऱ्यामध्ये पायाभूत सुविधा प्रकल्प, गुंतवणुकीला देणार चालना देण्यावर भर असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जायकाने राज्यातील अनेक प्रकल्पांना अर्थसहाय्य केले आहे. जपानमधील बुलेट ट्रेन आणि टोकियो मेट्रो ऑपरेशन्सला सुद्धा या दौर्‍यात ते भेटी देणार आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी 2015 मध्ये दौरा केला होता. जायकाने विविध प्रकल्पांसाठी महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांना वित्तपुरवठा केला होता. यात मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, बुलेट ट्रेन, मेट्रो-3, नागपूर नागनदी शुद्धीकरण अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांचीही भेट घेणार आहेत. जायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदार तसेच जपान-इंडिया असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांचीही ते या दौऱ्यावेळी भेट घेणार आहेत. तर राज्यातून अनेक प्रकल्प गेल्याची टीका वारंवार विरोधक करत असतात. दरम्यान या दौऱ्यावेळी फडणवीस अनेक गुंतवणूकदारांना ते भेटणार आहेत. या भेटींचा राज्याला काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.