सावंतवाडी : श्रीमती संध्या राजाराम तानावडे राहणार सावंतवाडी स्टेट बँक नजीक (वय ६०) असून त्या आपल्या नातेवाईकांबरोबर बाजारामध्ये राऊत परत दुकानाकडून आपल्या घरी जात होत्या. वाटेतच एका युवकाने गाडी आडवी आल्याने तिचा अपघात झाला. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये तिथल्या नागरिकांनी तिला प्राथमिक उपचारासाठी उपचार उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र सदर महिलेला कानामध्ये रक्त आल्यामुळे आल्यामुळे व ती थोडीशी अस्वस्थपणा असल्याने तिला पुढील उपचारासाठी गोवा बांबूळी येथे पाठवण्यात आले आहे.





