दिल्ली- दिल्ली सरकारमधील महिला व बालकल्याण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्याने मित्राच्या १४ वर्षीय मुलीवर अनेक महिने अत्याचार केलाय. दिल्ली पोलिसांनी आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला असून भारतीय दंड संहिता आणि पोक्सो अंतर्गत तक्रार दाखल केलीय. धक्कादायक म्हणजे अधिकाऱ्याच्या पत्नीनेही पतीला मदत केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या पत्नीविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. मुलगी बारावीमध्ये शिकत असून २०२० मध्ये मुलीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर अधिकाऱ्याने मुलीला आपल्या घरी आणले होते. २०२० ते २०२१ दरम्यान मुलीवर अनेकदा बलात्कार करण्यात आला. मुलगी जेव्हा गरोदर झाली तेव्हा आरोपीच्या पतीने मुलीला गर्भ रोखण्याच्या गोळ्या दिल्या.
मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बाहेरुन औषधी गोळ्या आणून महिलेने तिला खायल्या दिल्या.गर्भ रोखण्यासाठीच्या त्या गोळ्या होत्या. मुलीवर सध्या उपचार सुरु असून मॅजिस्ट्रेटसमोर तिचे म्हणणे रिकॉर्ड करायचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात आरोप झाल्याने पोलिस गांभीर्याने घेत असून प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे.





