भंडाऱ्याच्या लेकीने तैवानमध्ये भारताची मान उंचावली ; दोन सुवर्णपदकांवर कोरले नाव!

42

तैवान : भंडाऱ्याच्या मयुरी लुटे हिने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मयुरी लुटे हिने तैवानच्या आशिया कप सायकलिंग स्पर्धेत दोन गोल्ड मेडल जिंकलेत.चीनच्या तैवान इथं सुरू असलेल्या आशिया कप स्पर्धेत सायकलिंग प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करताना भंडाऱ्याच्या मयुरी लुटे हिनं दोन गोल्ड मेडल जिंकलेत.

कोलकात्ताच्या त्रिषा पॉल हिनं सिलव्हर मेडल जिंकलं. 200 मीटरच्या स्पर्धेत या दोघींनी भारतासाठी हे पदक मिळविलं.मयुरी लुटे ही भंडाऱ्याच्या बेला या गावातील शेतकरी धनराज लुटे यांची कन्या असून तैवान इथं काल आणि आज झालेल्या सायकलिंग स्पर्धेत तिनं हे पदक जिंकलं.