सावंतवाडीतील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा..! ; अर्षद बेग यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी.

42

सावंतवाडी : शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे एनजीओची मदत घेवून तात्काळ यावर योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष अर्षद बेग यांनी सावंतवाडी पालिकेकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन प्रसिध्दीस दिले आहे.

त्यांनी आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की, शहरात गेले अनेक दिवस मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. त्यांच्याकडुन हल्ले होण्याचे प्रकार सुरू आहेत. याबाबत वारंवार पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र तशा संबधित कोणतीही कार्यवाही पालिकेकडुन झालेली नाही. त्यामुळे कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. या घटनेची गंभीर दखल घेवून कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.