कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे तालुकास्तरीय विज्ञान मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे कांबळे यांनी केले. यावेळी भरडधान्य व पोषण द्रव्ये या आहार विषयावर वक्तृत्त्व स्पर्धा घेण्यात आल्या. कणकवली तालुक्यातून सोळा स्पर्धक सहभागी होते. परीक्षक प्रा . कांतीलाल जाधवर, सौ. मराठे मॅडम, श्री. पेंडूरकर सर होते . या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री बर्डे सर, सौ. केळुसकर मॅडम यांनी केले.

यावेळी वक्तृत्व स्पर्धेतून विद्यामंदिर प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी सान्वी रघुनाथ कारेकर (आठवी अ) वक्तृत्च स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून तिची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. मुख्याध्यापक पी. जे. कांबळे सरांनी तिचे अभिनंदन केले.
विज्ञानमेळावा या कार्यक्रमाला पर्यवेक्षक सौ. जाधव मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्री. वणवे आदी उपस्थित होते.





