सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून अजून एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. सावंतवाडी तालुक्यात एकूण ६३ ग्रामपंचायती असून प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी Q R code( क्यु आर कोड) उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. यासाठी आवश्यक कागद पत्रांचा नमुना संच ग्रामपंचायतमध्ये पोहोच करण्यात आलेला आहे.यामुळे ग्रामस्थांना नळपाणी, तसेच ग्रामनिधी खात्यांमध्ये भरणा करावयाच्या रक्कम आता थेट Q R code( क्यु आर कोड) मार्फत ग्रा.प.खात्यामध्ये वर्ग करता येईल, यामुळे वेळ तर वाचणार आहेच, परंतु व्यवहारामध्ये अधिक पारदर्शकता येउन सर्वांसाठी व्यवहार सोयीचे होतील.आजपर्यंत सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव, कोलगाव, माडखोल, सरमळे, ओटवणे, सोनुर्ली, मळेवाड कोंडुरे, कारिवडे इ.ग्रामपंचायतींना Q R code( क्यु आर कोड) बँकेने उपलब्ध करुन दिलेले आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रासह नजिकच्या सिंधुदूर्ग बँकेच्या शाखेत संपर्क साधून Q R code( क्यु. आर. कोड) मागणी करण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांनी केले आहे.
Home ब्रेकिंग न्यूज सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अभिनव उपक्रम ; ग्रामपंचायतींसाठी Q. R.Code( क्यु. आर....





